महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- शहरातील जुन्या पोस्ट कार्यालयाजवळ ऊसाच्या ट्रॅक्टर खाली महाविद्यालयात शिकणारी युवती अपघातात ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमृतवाहिनी महाविद्यालयात वैष्णवी साहेबराव गुंजाळ वय 19 वर्षे, रा. गुंजाळवाडी येथील रहिवासी असून ती आपल्या स्कूटीवरून जात असताना संगमनेर शहरातील जुन्या पोस्ट कार्यालयाजवळ ऊसाच्या ट्रॅक्टर खाली सापडून गतप्राण व्हावे लागले. वैष्णवी गुंजाळ ही अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्याल यातील द्वितिय वर्षात कॉमप्युटर इंजिनिअरींग शिक्षण घेत होती. वैष्णवीच्या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमी वैष्णवीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, परंतु त्यापूर्वीच वैष्णवी गुंजाळचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर सदरचा ऊसाचा ट्रॅक्टर संगमनेर शहर पोलीसांनी पोलीस स्टेशनला आणला असून या अपघात प्रसंगी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

