मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- पाथर्डी फाटा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती -पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गौरव जितेंद्र जगताप वय 29 वर्ष व नेहा गौरव जगताप वय 23 वर्ष, दोघेही रा.अनमोल नयनतारा सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहे.
काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास या दाम्पत्याने हॉलमध्ये असलेल्या सिलिंगच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्ये मागील कारण काय आहे आद्याप समजू शकले नाही आहे. जगताप दांम्पत्य फोन उचलत नसल्यामुळे नातलगाना शंका आली. त्यामुळे त्यांनी घराकडे जाऊन बघितल असता ही धक्कादायक प्रकार समोर आला.
मृतक जितेंद्र जगताप यांचे भाऊ व मावशी या दोघांनी जितेंद्र यांच्या मोबाईल वर फोन केला. फोन उचलत नसल्यामुळे त्यांना शंका आली. त्यानंतर त्यांचे भाऊ यश जगताप व काका अरुण गवळी यांनी घराकडे जाऊन बघितले असता, आवाज दिला पण कुणीही दार उघडल नाही त्यांनी दरवाजा उघडत नसल्यामुळे नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद इंदिरा नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत.

