पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
पुणे:- भारती विद्यापीठ पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर 848/2022 भा.द.वि. कलम 454, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्याअनुषंगाने Unit-2 कडील स्टाफ त्यांचा शोध घेत होते. दरम्यान तपासात सदरचा गुन्हा सिद्धार्थ भालेराव रा. डोंबिवली (पु) मुंबई याने त्याचा साथीदार रोहित लंके यांचेसह केल्याची खात्रीशीर बातमी Unit-2 ला मिळाली होती. त्याअनुषंगाने त्याचा शोध Unit-2 कडून सुरू होता.
दरम्यान आजरोजी Unit-2 कडील स्टाफ ख्रिसमस निमित्त लष्कर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व गजानन सोनुने यांना दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सिद्धार्थ भालेराव रा. डोंबिवली (पु) मुंबई हा पुणे रेल्वे स्टेशन पार्किंग मध्ये थांबला असून त्याचे जवळ काळ्या रंगाची विनानंबर प्लेट ऍक्टिवा मोपेड आहे, अशी खात्रीलायक बातमी आरोपीच्या वर्णनासह मिळाली. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो. याना अवगत करता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. लागलीच Unit-2 कडील स्टाफने बातमी ठिकाणी धाव घेत सापळा रचून प्राप्त वर्णनावरून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने सिद्धार्थ उर्फ रोहित उर्फ किड्या अनिल भालेराव वय-20 वर्ष, रा. संभाजी पथ, रा. डोंबिवली (पु) मुंबई असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्ह्याअनुषगाणे चौकशी करता, त्याने गुन्ह्यात सहभागाची कबुली देऊन त्याचे ताब्यातील ऍक्टिवा मोपेड त्याने गुन्ह्यात वापरल्याचे देखील समक्ष सांगितले. सदर 40,000 ₹ किमतीची ऍक्टिवा मोपेड गुन्ह्यात जप्त करून आरोपी सिध्दार्थ भालेराव यास वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी * भारती विद्यापीठ पो स्टे* च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, Unit-2 प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली psi राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, संजय जाधव, विजय पवार, साधना ताम्हणे, कादिर शेख, समीर पटेल ,निखील जाधव, मोहसीन शेख, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे*

