पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- फिर्यादी यांना त्यांचे अंडाभुर्जीचे गाडीवर त्यांचे तोंड ओळखीचा इसम या मोरया त्याचे स्वारगेट एसटी स्टॅन्ड समोरील अंडाभुर्जीचे हातगाडीवर येवुन त्यांना फुकट अंडा राईस मागितला व तो देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता त्याने त्याचे जवळ असलेल्या पिस्तुलया बाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने फिर्यादीला अंडाभुर्जीच्या गाडीपासून बाजुला ढकलून गल्ल्यामधुन एकूण २६३०/- रुपये रोख रक्कम घेवून पळुन गेल्याने फिर्यादी यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि.नं. २६२/ २०२२ भा.दं.वि. कलम ३९२. आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील आरोपी बंडया थोरवे हा स्वारगेट येथील गुलटेकडी आला आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे व अनिस शेख यांना मिळाल्याने त्यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रभात संदे यांना माहिती दिल्याने त्यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांना समरबाबत माहिती दिली असता, खात्रीकरून कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे व तपास पथकातील पोलीस अंमलदार ८२३९ सोमनाथ कांबळे, मो/अ ९८२० अनिस शेख, पो/ ९८०३ किरण भरगुडे व पो/ १००६८ चव्हाण यांचेसह बातमीचे ठिकाणी रवाना होवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबले असता सदर ठिकाणी बंडया थोरवे हा पायी चालत येत असल्याचे दिसुन आल्याने सपोनि प्रशांत संदे यांनी त्यास बंडया म्हणून आवाज दिला असता तो त्यांना पाहुन पळुन जावु लागल्याने त्यांनी वरील स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करून शिताफीने त्यास पकडुन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव बंडया ऊर्फ काळुराम प्रशांत थोरवे वय ३० वर्षे रा. ६७७, घोरपडी पेठ खडकमाळ आळी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. २३/१२/२०१२ रोजी १६/१५ वा. अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने दाखल गुन्हयात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे तसेच चोरी केलेली रोख रक्कम असा एकुण २७,०१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच
त्याने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत तपास चालू आहे.
सदरची कामगिरी ही मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोहवा मुकुंद तारु तसेच पोलीस अंमलदार, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, किरण भरगुडे, रमेश चव्हाण. फिरोज शेख, दिपक खेदाड, शिवा गायकवाड, प्रविण गोडसे यांनी एकत्रीतपणे केली आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

