पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रचा घेतला लाभ.
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, माजी पंतप्रधान, भारतरत्न, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय राजुरा त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे जीवनावर प्रकाश टाकत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मन की बात कार्यक्रम ऐकण्यात आला.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजप जिल्हा सचिव वाघूजी गेडाम,भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगनलावार, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, अनिल खनके, ग्रामपंचायत सदस्य नंदोकिशोर कुबडे, मंगेश श्रीराम, संजय जयपूरकर, संदीप मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

