पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहनचोरी पथक १ पुणे शहर
पुणे :- शहरामध्ये वाहन चोरीला आळा बसावा या करिता मोहीम राबवून करवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेश दिल्याने त्या अनुषंगाने दिनांक २५/१२/२०२२ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि नरेंद्र पाटील व पो ना ढगे असे लष्कर पो स्टे गु र क्र १६७/२०२२ भा द वि कलम ३७९ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून नमूद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून
त्यास शिंपी अळी, कसबा पेठ येथून चोरीच्या मो/सा सह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता ………….
वर नमूद विधिसंघर्ष बालकास त्याची आई नामे अफरिन शेख यांचे समक्ष ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करता त्याने सदरची मो/सा चोरी केल्याचे कबूल केल्याने त्याच्याकडून लष्कर पो स्टे गुन्हा रजि नं १६७/२०२२, भा दं वि कलम ३७९ हा उघडकीस आला असून त्याच्याकडून ७०,०००/- रु किमतीची सुझुकी बर्गमन मो/ सा पंचनाम्याने जप्त करून नमूद विधीसंघर्ष बालकास पुढील कारवाई कामी लष्कर पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, मा. पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील, पोना गणेश ढगे व पो शि बनकर यांनी केली आहे

