पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- दि. २३/१२/२०२२ रोजी वानवडी पोलीस ठाणेचे तपासपथक प्रभारी सहा. पोलीस निरिक्षक जयवंत जाधव व पोउनि भोसले तसेच पो. अंम अमजद पठाण, संतोष काळे, महेश गाये, निलकंद राठोड व विष्णु सुतार असे वानवडी पोलीस ठाणे हद्दीत होणारे वाहनचोरीस आळा घालणेकामी सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना पो. अंम निलकंठ राठोड विष्णु सुतार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक इसम त्याचेकडे एक फाळे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम एच १२ एच एस ८३१३ ही घेवून मारुती मंदिरासमोरील रोडवर, शिंदे छत्रीजवळ, वानवडी, पुणे येथे थांबलेला असून तो त्याचेकडील मोटारसायकल ही कमी किमतीत विकण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी ती मोटारसायकल ही चोरीचीच असावी.” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि जयवंत जाधव, पोउनि भोसले व वरील स्टाफ यांनी सदरबाबत पोलीस निरिक्षक (गुन्हे) संदिप शिवले सो यांचे आदेशाने बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचुन बातमीतील वर्णनाचे इसमास पैशन प्रो मो.सा.क्र.एम एच १२ एच एस ८३१३ या मोटारसायकल सह जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सर्फराज ऊर्फ बॉब इकबाल मोमीन, वय २३ वर्षे, धंदा. काहीनाही, रा. अलिफ टॉवर, मीठानगर, गल्ली नं.५, कोंढवा, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याचेकडे असलेल्या सदर मोटारसाकलबाबत त्याचेकडे तपास केला असता, नमुद मोटारसायकल ही त्याने पंधरा दिवसांपूर्वी गल्ली नं. २६ / ए, तुर मज्जीदजवळ, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे येथून चोरी केलेली असलेबाबत सांगीतले, त्यावेळी खात्री करता, सदर पेंशन प्रो मो.सा.क्र.एम एच १२ एच एस ८३१३ ही चोरीस गेलेबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५०३/२०२२, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळाली म्हणून नमुद गाडी त्याचेकडुन जप्त करून ताब्यात घेण्यात आलेली असून त्यास दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे उकृष्टरित्या अधिक तपास केला असता, त्याने चोरी केलेल्या आणखी ०२ मोटारसायकल स्वखुशीने निवेदन देवून काढुन दिलेल्या आहेत. तसेच त्याचेकडुन एकुण १,२०,०००/- रु. किं. च्या एकुण ०३ मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या असून त्यासंदर्भात दाखल असलेले वाहनचोरीचे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात वानवडी पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कारवाई ही मा. विक्रांत देशमुख सर, पोउआ परिमंडळ ५ पुणे शहर व मा. पौर्णिमा तावरे सो स. पो. वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पो.अम. अमजद पठाण, संतोष काळे, विनोद मंडलकर, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ रावोह, अमोल गायकवाड, विष्णु सुतार यांनी केली आहे.

