वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे,दि.25 डिसें:- रोजी प्रेम, मैत्री आणि सहिष्णुता याचा संदेश देणारा सण म्हणजेच नाताळ, याचे औचित्य साधत युवा प्रेरणा प्रतिष्ठान पुणे तर्फे एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
टेंशन नाही असा एकही माणूस या भुतलावर शोधूनही सापडणार नाही. आजच्या धावपळीच्या या जीवनात मनुष्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. थोडा का असेना पण मानसाला त्याच्या आयुष्यात थोडेसे सूख, समाधान हवे असते, एक प्रेमाची मिठी त्याला थोडा वेळ का असेना खूप सारे समाधान देऊन जाते. त्यामुळे ‘युवा प्रेरणा प्रतिष्ठान पुणे’ संस्थेच्या माध्यमातून असाच आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज येथे नाताळ ख्रिसमसचे औचित्य साधून राबविण्यात आले, ‘विनामूल्य मिठी अॕकटीविटी’ असे या उपक्रमाचे नाव होते, यावेळी प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

आपली एक मिठी कोनाच्या तरी आयुष्यात थोडेसे सूख समाधान देऊन जाते, त्याला थोडा वेळ का असेना पण एक प्रकारच समाधान देऊन जाते. त्यामुळे हा ‘विनामूल्य मिठी अॕकटीविटी’ हा अभिनव उपक्रम राबवून यावेळी तेथे आलेल्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. या उपक्रमाचे मूख्य कार्यकर्ते आशिष भागवत, स्वरूप थोरात, पार्थ वाघमारे, संदीप देवकाते, अमर लहांगे, साक्षी गायकवाड, शूभम भंडारे, शूभम मोझरी, अथर्व निकाळजे, सागर गिरी, मानसी काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

