युनिट-२, गुन्हे शाखा पुणे शहर
पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
पुणे:- दि. २१/१२/२०२२ रोजी युनिट-२ चे प्रभारी मा. पोलीस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील हे
स्वारगेट पो.स्टे.च्या हद्दीत जेधे चौक येथे गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारा मर्फत बातमी मिळाली की, स्वारगेट ब्रीजचे खाली कॅनोल लगत अंधारात चार ते पाच गुंड प्रवृत्तीचे लोक वय २५ ते ४० असलेले, अंगाने जाडजुड असुन मोटार सायकलवर थांबलेले आहेत. ते येणा-या जाणा-या लोकांना लुटण्याचे तयारीत आहेत अशी खात्रीशीर वर्णनासह बातमी मिळाली…
सदर बातमीचे अनुशंगाने नमुद ठिकाणी सापळा रचुन अचानक छापा टाकुन बातमीतील वर्णनाचे चार इसमांना ताब्यात घेतले आहे. त्या दरम्यान एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) अक्षय किशोर शिंदे, वय २८, रा. पवारवस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे २) सतीश दशरथ साळुंखे, वय ५०, रा. ५२६. रासकर मळा, मुंढवा, पुणे ३) अनिल शंकर जाधव, वय ४०, रा. केशवनगर मुंढवा, पुणे ४) संदीप बाबुलाल कोरे, वय २७, रा. पर्वती दर्शन, पुणे व पाहिजे असलेला आरोपी योगेश माने हा असून त्यांच्या अंगझडती मध्ये एक कटर एक मिरची पावडरची फोडलेली पुडी, एक लोखंडी भरीव रोड, दोन मोटरसायकल, एक एक्टिवा गाडी ०६ मोबाईल फोन असा एकुण २,८१,०९०/- रु किचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी हे येणा-या जाणा-या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून लोकांना लुटण्याचे तयारीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि नं. २६७/ २०२२ भादवि कलम ३९९ ४०२, महा. पो. अॅक्ट ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून करण्यात आला असुन आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे गुन्हे शाखा युनिट दोन हे करीत असून तपासा दरम्यान पाच गुन्हे उघडकीस आले.
१) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं. १२०३ /२०२२, मादविक. ३७९
२) स्वारगेट पोलीस स्टेशन गुरनं. २१८/२०२२ मादविक, ३७९
३) डेक्कन पोलीस स्टेशन गुरनं. १०९/२०२२ भादविक. ३७९ तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल
करण्याचे काम चालू आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. राहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १ श्री गजानन टोम्पे व प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरिक्षक, नितीन कांबळे, पोलीस उप- निरिक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार, अंशंकर नेवसे, प्रमोद कोकणे गणेश थोरात, समीर पटेल, कादिर शेख व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.

