ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- आज दिनांक 29 डिसेंबर रोजी शिंदाड येथे लायन्स क्लब व कांताई नेत्रालय यांच्यातर्फे आज नेत्र व शस्त्रक्रिया तपासणी आयोजित करण्यात आले होते. तसेच या शिबिराचे आयोजन डॉ. मयूर अशोक पाटील तसेच आई ऑनलाईन सर्विसेस चे संचालक श्री राहुल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून शिंदाड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुणे म्हणून वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नीलकंठ पाटील यांच्या शुभ हस्ते शिबिराची सुरुवात करण्यात आली व तसेच कांताई नेत्रालय हॉस्पिटलचे डॉ. वैभव शिंदे व विनोद पाटील यांचे स्वागत विकास सोसायटी चेअरमन समाधान सिताराम पाटील व सरपंच ज्ञानेश्वर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉ. मयूर पाटील यांचे स्वागत सुनील लोधी यांच्या हस्ते करण्यात आले.

या नेत्र व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये जवळपास 120 लोकांची तपासणी करण्यात आली, असून त्यामधून 30 लोकांचे आजच्या तारखेला शस्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे व आतापर्यंत डॉक्टर मयूर पाटील यांच्या माध्यमातून जवळपास 130 लोकांचे ऑपरेशन मोफत करण्यात आले असून ते ऑपरेशन यशस्वीरित्या सर्व ऑपरेशन पूर्ण झाले व येणाऱ्या काळात 1000 च्या वरती आकडे जाण्याची शक्यता आहे व यावेळी उपस्थित शिंदाड गावाचे सरपंच ज्ञानेश्वर तांबे ,उपसरपंच. नरेंद्र विक्रम पाटील, दशरथ आबा पाटील व माजी सरपंच इंदल भाऊ परदेशी, ग्रामपंचायत सदस्य व तसेच या शिबिरासाठी सहकार्य शिंदाड येथील तरुण मित्रपरिवार मयूर परदेशी, संकेत पाटील, सागर पवार, सुनील पाटील, होमगार्ड ,भूषण राजपूत यांनी सहकार्य केले व गावातील ग्रामस्थ मंडळी या शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348