शासकीय निवासी शाळेत वायफाय सुविधा लॅग्वेज लॅब, डिजीटल क्लासरुम, संगीत कक्ष.
✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.29:- समाजकल्याण आयुक्त डॅा.प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी निवासी शाळेतील विविध सुविधांचा लाभ घेऊन आपल्या यशाचा मार्ग सुकर करावे, असे सांगितले.
आयुक्त नारनवरे यांनी शासकीय निवासी साळा उमरी (मेघे) येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड उपस्थित होते. सदर भेटीमध्ये शाळेमध्ये राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची पाहणी मान्यवरांनी केली. शासकीय निवासी शाळेमध्ये विकसीत करण्यात आलेल्या लॅग्वेज लॅब, डिजीटल क्लासरुम, संगीत कक्ष, कार्यानूभव कक्ष, चित्रकला कक्ष, गणित कक्ष या मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडून त्यांना अत्याधूनिक सोई सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शाळेचा विकास सीबीएसईच्या शाळेच्या धर्तीवर होत असल्याबाबत आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी समाधान व्यक्त केले.

उमरी येथील शाळेमध्ये असलेल्या वायफाय सुविधेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमा बाबतची तसेच इतर नाविन्यपुर्ण संकल्पनाची माहिती सहजरित्या प्राप्त करून घेणे सोईचे झाले आहे. सदर भेटी दरम्यान क्रीडा स्पर्धामध्ये विभागस्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रडताळणी समितीचो सदस्य शरद चव्हाण, सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

