Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अहमदनगर जिल्हा मात्र नामांतराचा प्रश्न पेटला, जिल्हा एक, नामांतर साठी नावं दोनं, आणि विभाजनाच्या चर्चा आहेत तीन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अहमदनगर जिल्हा मात्र नामांतराचा प्रश्न पेटला, जिल्हा एक, नामांतर साठी नावं दोनं, आणि विभाजनाच्या चर्चा आहेत तीन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगरः नगर हा जिल्हा एक आहे मात्र त्याच्या नामांतरा साठी दोन नावांचा आग्रह आहे. आणि काहींच्या मते जर नगरचं विभाजन झालं तर ते 3 भागात व्हायला हवं असं मत व्यक्त केले जात आहे.

जिल्हा एक, नामांतरासाठी नावं दोनं, आणि विभाजनाच्या चर्चा आहेत तीन तर महाराष्ट्रात श्रेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा आणि वेगवेगळ्या 4 प्रांताना जोडणाऱ्या सीमा आणि देशातल्या 6 मोठ्या राज्यांहून मोठा भाग म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे. अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याचं नामांतर आणि विभाजनाचा वाद सुरु आहे. या दोन्ही मुद्द्यांना परत एकदा राजकीय फोडणी मिळाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली आहे. तर विभाजनाऐवजी नामांतर व्हावं, असं भाजपचे खासदार सुजय विखे यांचं म्हणणं आहे. नामांतर च्या वादातही दावे-प्रतिदावे आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनीच नगरचं नाव बदलून अंबिकानगर व्हावं, अशी मागणी 1995 मध्ये केली होती. त्यानंतर 2 वर्षांपूर्वी नगरचं अहिल्याबाईनगर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

वास्तविक नगरच्या विभाजनाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र तत्कालीन काँग्रेसचे दोन्ही बडे नेते अर्थात राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्या मतभेदांमुळे तो मुद्दा मागे पडल्याचं बोललं जातं आहे.

संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे तर त्यामुळे नगरचं विभाजन झालंच तर नवा जिल्हा संगमनेर व्हावा. यासाठी आग्रह होता.
विखे समर्थक गट नगरच्या विभाजनातून शिर्डी हा नवा जिल्हा व्हावा, या मताचा होता आणि नगरमधले इतर नेते मोठी बाजारपेठ म्हणून विभाजनातून श्रीरामपूर किंवा मग कोपरगावला जिल्हा बनवण्याच्या विचारांचे असल्याचे बोलले जात आहे.

विभाजन झालं तर कोणता जिल्हा तयार व्हावा यासाठी 3 नावं आहेत. आणि नामांतर झालं तर काय व्हावं, यासाठ दोन नावांचा आग्रह धरण्यात आला आहे. 1486 मध्ये मलिक अहमद हा दख्खन भागातल्या निजामशाहीच्या पंतप्रधान बनला 9 वर्षानंतर त्यानं सीना नदीच्या काठावर एक शहर वसवलं त्याच शहराला पुढे अहमद नावं दिलं गेल्यामुळे ते आजचं अहमदनगर बनलं.
1995 दरम्यान नगरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. केडगावात अंबिकेचं मंदिर असल्यामुळे अहमदनगरचं नाव अंबिकानगर करावं, अशी मागणी पहिल्यांदा शिवसेनेनं केली. अंबिकानगरच्या नावाला शिवसेनेसह मनसेचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

आता नगरला पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं नाव देण्याची मागणी का होते तर महान शिवभक्त, उत्तम शासक, शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई साऱ्या देशाला ठाऊक आहेत. त्याच अहिल्याबाईंचा जन्म नगर जिल्ह्यातल्या चौंडी गावात झाला आहे. म्हणून नगरला अहिल्यानगर नाव देण्याचीमागणी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Previous Post

इगतपुरी येथील जिंदाल कंपनीतील स्फोटात आणखी एकाचा मजुराचा मृत्यू, मृताचा आकडा झाला तीन.

Next Post

अजित पवार यांचा संभाजी राजे यांच्या बाबत केलेल्या विधानाचा बीजेपी तर्फे निषेध, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अजित पवार यांचा संभाजी राजे यांच्या बाबत केलेल्या विधानाचा बीजेपी तर्फे निषेध, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.

अजित पवार यांचा संभाजी राजे यांच्या बाबत केलेल्या विधानाचा बीजेपी तर्फे निषेध, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In