मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री गुरुदेव सेवा मंडळ हिंगणघाटच्या वतीने आज 6 जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील दोन ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र राठी व दशरथ ढोकपांडे यांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
श्री राजेंद्र राठी व दशरथ ढोकपांडे हे मागील 35 वर्षा पेक्षा अधिक काळा पासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून अनेक लोकहिताच्या वृत्तांना त्यांनी अग्रक्रमाने प्रसिद्धी देऊन त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांच्या सेवेची दखल घेऊन आज पत्रकार दिना निमित्ताने या दोघांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी गुरुदेव सेवा संघाचे कार्यकर्ते व पत्रकार मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद रफिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्कारमूर्ती राजेंद्र राठी व दशरथ ढोकपांडे यांनी समयोचित शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348