राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
धाबा :- ग्रामपंचायतीचा प्रमूख गावचा कारभार पाहणारा आणि प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच, गावाचा विकास घडवायचा असेल तर सरपंचाची भुमिका महत्वाची मानली जाते. आणि म्हणूनच सरपंच यांना ऑनलाईन बाबत काही माहिती व्हावी,ग्रामपंचायतीचा ऑनलाईन कारभार प्रत्येक सरपंचाला कळवा हा हेतू समोर ठेवत ऑनलाईन ईग्रामसॉफ्ट बाबत उजळणी प्रशिक्षण पंचायत समिती गोंडपीपरी चा सभागृहात दि.4 ऑगस्ट रोजी आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक अमोल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.
ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे केला जातो ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोण कोणत्या सुविधा ऑनलाईन दिल्या जातात. ऑनलाईन ईग्रामसॉफ्ट वेतन प्रणाली, याबाबत सविस्तर अशी माहिती या प्रशिक्षणात अमोल वानखेडे यांनी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तालुक्यातील सरपंच यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच संघटनाचे तालुका अध्यक्ष देविदास सातपुते सरपंच पोळसा, उपाध्यक्ष निलेश पुलगमकर सरपंच हिवरा,पोचूमल उदेडला सरपंच चेकघडोली, धुमने सरपंच पानोरा,पाल सरपंच चेकदरूर, सोबतच तालुक्यातील सर्व सरपंच उपस्थीत होते.
ऑनलाईन, mahaonegov व ईतर अध्यावली बाबत बरीच माहिती सरपंच यांना नसते, त्यामुळे असे प्रशिक्षण व अद्ययावत नवीन माहिती सरपंचांना मिळावी यासाठी प्रत्येक महिन्यात प्रशिक्षण व्हावे, याचा फायदा सरपंच यांना होते. व गाव विकासासाठी उपयोगी पडतो.
देविदास सातपुते, तालुका अध्यक्ष सरपंच संघटना गोंडपीपरी