पत्रकार संघाचा वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.
सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- मराठी पत्रकारिते चे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी जयंती दिनी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूरचा वतीने नगरातील सर्व पत्रकारांचे स्नेहमिलन नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार आणि पत्रकार संघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष स्व. सुरेश रामगुंडे यांचा समूर्ति प्रित्यर्थ रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कळस्कर यांचा हस्ते करण्यात आला. बल्लारपूर मेडिकल असोसिएशन BMA हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंदनसिह चंदेल माजी वनविकास महामंडळ(म .रा)प्रमुख अतिथी घनश्याम मुलचंदानी, विशेष अतिथी अब्दूल करीम भाई काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपस्थितीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच यांचा शाल श्रीफळ समूर्तीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोठारीचे सरपंच अश्विनी हर्षल वासंमवार, जुनोनाचे सरपंच विवेक शेंडे, बामणीचे सरपंच प्रल्हाद बुधाजी आलाम, ईटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरे, कटवलीचे सरपंच राजेश ढुंमने यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी सर्व सरपंच यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या व गावाचा विकास करण्याकरिता प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य सदयस जेष्ठ पत्रकार पद्माकर पांढरे, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मुन्ना खेडकर,बल्लारपूर तालुका अध्यक्ष अजय रासेकर, देवेंद्र झाडे, पारिष मेश्राम, रमेश निषादयांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात उपस्थित शहरातील जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, नरेंद्र सोनारकर, नारद प्रसाद, सुजय वाघमारे, देवानंद देशभ्रतार, मनोहर दोतपेलली आदी पत्रकार उपस्थित होते. सर्व पत्रकाराना भेट वस्तू देऊन पत्रकार दिन म्हणून साजरा करून सर्व पत्रकार यांना गौरविण्यात आले.