पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांबाबत माहिती काढुन कडक कारवाई करणेबाबत दिलेले सुचना च आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ असे दिनांक ०४/०१/२०२३ रोजी येरवडा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके व मारुती पारधी यांना माहिती मिळाली की, पुणे संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात दोन इसम एम. डी. या अंमली पदार्थ विक्री करीत आहे.
सदर माहितीच्या अनुषंगाने पुणे संगमवाडी येथील संगमवाडी ब्रीज येथे दोन इसम संशयितरित्या उभे असलेला दिसले. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफने छापा कारवाई करुन इसम नामे १. अफजल इमाम नदाफ, वय-२६ वर्षे, रा. नई जिंदगी, गल्ली सितारा चौक, सोलापुर २ अर्जुन विष्णु जाधव, वय-३२ वर्षे, रा. राजुगांधी नगर वसाहत, संगम वाडी, पुणे सध्या रा. वाकसे चाळ, वरसुली टोल नाक्याजवळ, लोणावळा, पुणे यांना ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात एकुण २०,१२,६०० रु चा १०० ग्रॅम ३८० मिलीग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ मोबाईल फोन असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे. सदरबाबत येरवडा पो स्टे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क). २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीकडे चौकशीत त्याने सदरचा एम. डी. हा अंमली पदार्थ सांताक्रुज मुंबई येथून आणला असल्याचे सांगितले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, श्री. रितेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे. श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- १, श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड. सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप शिर्के प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव व योगेश मोहिते यांनी केली आहे.