✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 7 जानेवारी:- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात सतत महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करून राज्यात अशांतता निर्माण होईल असे वर्तन राजकीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल करत आहे. या अगोदर वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोश्यारींच्या या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348