✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लांजा:- राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील लांजा तालुका नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व उप सरपंच आणि सदस्य ह्यांचा शिवसेना सचिव, खासदार विनायकजी राऊत तसेच शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख पांडुरंग उपळकर, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, माजी जि प सभापती चंद्रकांत मणचेकर, उप तालुकाप्रमुख दिलीपभाऊ पळसुलेदेसाई, सुरेश करंबेळे, विभागप्रमुख शरद चरकरी, युवराज हांदे, संतोष गुरव, लक्ष्मण मोर्ये, उद्योजक अनिलशेठ पत्याणे, उप विभागप्रमुख सिद्धेश पांचाळ, प्रदीप गार्डी, राजेंद्र पालये, विश्वास मांडवकर, चेतन खंदारे, सुरेश सावंत, माजी जि प अध्यक्ष स्वरूपाताई साळवी, महिला तालुका संघटक लीला घडशी, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, युवती तालुकाधिकारी दीपाली दळवी, शिवसहकार तालुका संघटक चंद्रकांत शिंदे, विभाग संघटक रवीद्र डोळस, उप नगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये, नगरसेवक स्वरूप गुरव, राजू हळदणकर, लहू कांबळे, वैभव जोईल, संदीप सावंत यांच्यासह तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी आणि नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्यासंख्येेने उपस्थित होते.