अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.न.982272413
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 8 जाने:- सावनेर पहलेपार येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 10 जानेवारी मंगळवारला संकट चतुर्थीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार सावनेर निवासी स्वातंत्र्य संग्राम सैन्यानी स्वर्गीय भैय्यालालजी बुधोलिया परिवारातर्फे करण्यात आला आहे.
गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळले असल्यामुळे सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका या मंदिरा बाबत संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.
यामुळे येथील मंदिरात मंदिर कमिटीद्वारे सकाळी 7 वाजता पासून अभिषेक व गणेश मूर्ती पूजन, सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता पासून गणेश महिला भजन मंडळ सावनेर तर्फे कार्यक्रम आणि दुपारी 2 वाजता पासून अरुणाताई खोंडेकर महिला मंडळ सुंदर कांड यांच्या कार्यक्रम होणार आहे. सकाळी 7 ते रात्री 10 वा.पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून सायंकाळी 7 ते 11 या वेळेत भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नितिनभाऊ राठी, डॉ. विजय धोटे, विनोदकुमार बुधोलिया, राजेंद्र चौरसिया, अशोक बुधोलीया, संजय वीरसेन, रमेश भोंगा, सुरेश बुधोलीया, राजेश कुछवाह, शंतनू बुधलिया, ओमप्रकाश दीक्षित, अमर बुधोलीया, प्रदीप बारई, रमेश पहाडे, विजय बुदुलिया, राजू गजरे, राजेश बुधोलीया, गौरीशंकर सातपुते, गोविंद लोध, अजय बुधोलीया, मनोज सोनी, अतुल नलगुंडवार, रवींद्र बरेडिया, भुपेंद्र पुरी, प्रमोद ढोले, रवींद्र देशमुख, अशोक उपाध्याय, संजय भाटेले, शुभम उपाध्याय प्रयत्नशील आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348