नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नायगाव पालघर:- येथून एक युवतीला दोन महिलांनी नौकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयाने फसवणूक करत फरार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुमारी वंदना कुमार कनकीया व उज्वला महेश पटेल असे आरोपी महिलेचे नाव आहे. यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी युवतीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद दिनाक 05 जानेवारीला श्रीमती रुपाली मकरंद वेदपाठक वय 34 वर्ष राह. नायगाव कोळीवाडा येथे राहते. लॉकडाऊनचा आधी पार्लरचे काम करता होती विरार मध्ये पण लॉकडाऊन मध्ये त्या महिलाचा जॉब गेला. त्यामुळे ती बेरोजगार झाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ती भेटेल ते मी काम करत होती. मी सप्टेंबर महिन्यात २०२२ मध्ये एका महिन्यासाठी पेईंग गेस्ट म्हणून ममता गिरनार नायगाव पूर्व येथे रूम फ्लॅट मध्ये राहत होती या रूम मध्ये वंदना कनकिया वय अंदाजे 25 वर्ष ही पण तिथे राहायला आली होती. त्या दोघी एकत्र पण राहत असताना वंदना हीचा मार्फत उज्वला तांडेल (उज्वला महेश पटेल ) वय ३२ अंदाजे ही सुद्धा आमचा रूम मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास आली. वंदना ही सुपरव्हाझहर या पदावर कार्गो इंडिया एअर लाईन मध्ये सांताक्रुझ मुंबई येथे नोकरी करते असे तिने सांगितले होते. माझा कडे सध्या कुठलाही रोजगार नसल्यामुळे मी नोकरी शोधत होती दिनाक ०८/०९/२०२२ रोजी आम्ही या पेईंग गेस्ट रूम मध्ये असताना मला वंदना हिने काम नोकरी हवी आहे का अशी विचारणा केली यावर मी तीला होकार दिल्यावर तिने आमचे सराना विचारते आणि सांगते असे तिने मला कळवले.
त्याच दिवशी तिने सायंकाळ तिने मला आमचा सरांनी तुमचा नोकरी साठी होकार दिला आहे असे कळवले. त्यावेळेस तीला पगाराबाबत विचारणा करता पगार ४० हजार ते ७० हजार रुपये पर्यंत तुझा पगार असेल सांगून २ दिवसानंतर १४ ते १५ सप्टेंबर २०२२ रोज तिने कॉल करून माझी कोकिळा बेन हॉस्पिटल मुंबई येथे मेडिकल चेक अप होणार असल्याचे सांगितले या मेडिकल व यूनीफॉर्म साठी पैसे मागितले होते. त्यावर मी तिला जी पे करते असे बोलली असताना तिने कॅश दया असा आग्रह धरून सर वाईट स्वभावाचे आहेत तुमचा फोन नंबर त्याचा कडे नको असे सांगितले. दिनाक ०८ सप्टेंबर २०२२ रोजी तिने १४००० रुपये द्या तुम्हीही नोकरी पक्की होऊन जाईल. १४ तारखेला जवळ आल्यावर मी तीला मेडिकल चेकअप साठी कधी जायचे आहे या बाबत तिला विचारणा केली असताना वंदना कनकिया ही हात पाय दुखत आहे ह्याची कारणे सांगून मला टाळू लागली. दिनाक ०८.०९.२०२२ रोजी पासून ते ११.११.२०२२ या कालावधीत मला कार्गो इंडिया एअर लायन मध्ये सांताक्रुझ मुंबई इथे नोकरी लावण्याचे बहाण्याने अजुन २६३००० रुपये वंदना कुमार कनकिया व उज्वला तांडेल (उज्वला पटेल) माझा कडून घेतले. जेव्हा मला फसवणूक झाल्याची जाणीव झाली तेव्हा मी त्यांचा कडे पैसे परत मागितले असता आज उदया देते असे सांगून अजपोवतो मला त्यांनी पैसे परत केले नाही.
सदरचे पैसे मी बँक मध्ये देणार होते परंतु वंदना कुमार कानकिया व उजवला तांडेल (उज्वाला पटेल) यांनी बँक ट्रान्स्फरला मना करून रोखीने कॅश मागितली सदरचे कॅश रोखीने दिले आहेत पहिल्यांदा माझा कडून दोघींनी नायगाव इथ व वसई या ठिकाणी केला बहुतांशी कॅश नायगाव (प) इथ दिली आहे. तसेच एक १६८०८ रुपये किमतीचा ऑप्पो A076 सुधा उजवला तांडेल हीस माझा नावावर लोन घेऊन दिलेला आहे. सदरचे पैसे ती एक महिन्यात परत करणार होती परंतु सदरचे कॅश व मोबाईल मला परत केला नाही.
मी माझी रक्कम परत मागितली असता त्या दोघींनी मिळून मला जिवानिशी ठार मारण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. मी गरीब परिवारातील असल्यामुळे माझ्या साठी ते पैसे खूप महत्वपूर्ण होते. त्या दोघी नायगाव येथील घर सोडून फरार झाल्या आहेत. अशा रितीने माझी फसवणुक झाली असल्याची माझी खात्री करून मी या दोघी विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
तरी दिनाक ०८/०९/२०२२ रोजी पासून ते ११/११/२०२२ या कालावधीत वंदना कुमार कनकीया राहणार माहित नाही यांनी आपसात संगनमत करून मला कार्गो इंडिया एअर लाइन्स मध्ये सांताक्रुझ मुबई येथे नोकरी लावन्याचा बह्यानाने ऐकून २६३००० रुपये व ओप्पो A076 कंपनीचा मोबाईल 16808 व रक्कम घेऊन दोघी पण फरार आहेत. रुपाली मकरंद वेदपाठक नायगाव पोलिस स्थानक मध्ये जाऊन या सादर गुन्हा बदल तपास अधिकारी राजू लक्ष्मण नमव इन्स्पेक्टर कैलाश वसंत बर्वे यांना भेट देऊन फिर्याद दाखल केली आहे.
वंदना कुमार कानकिया व उज्वला तांडेल (उज्वला पटेल) या महिला गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आहे. या सगळ्यांकडून अस खोटे आमिष दाखुन लोकांना लूबडते व फसवणूक करून फरार होते हे त्यांचं काम आहे. हिने आपल्याच पतीची हत्या केली आहे. ती सध्या जमानतीवर बाहेर आहे.
या महीलान विरोधात सदर गुन्हा वालिव पोलिस ठाणे दाखल करण्यात आला आहे. त्यात पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोद करून क्रमांक १२८५ भारतीय दंड १८६० / ३४ भारतीय दंड १८६०/४२० गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास वालिव पोलिस करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348