तिरुपती नल्लाला राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- मौजा कोलगाव ,तहसील राजुरा,येथील काही जमीन धोपटाला प्रकल्पाकरिता अधिग्रहित झाली, त्यानंतर उर्वरित जमीन पुरामुळे बुडण्याच्या वाढलेल्या धोक्यामुळे शेतकऱ्यांचे वतीने वारंवार ही जमीन अधिग्रहित करण्याबाबत पाठपुरावा जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष राजूभाऊ घरोटे, पुरुषोत्तम लांडे सरपंच, एड अभियंता प्रशांत घरोटे यांच्या माध्यमातून हंसराज अहिर अध्यक्ष मागासवर्गीय आयोग तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे कडे करण्यात आली होती. त्याला यश प्राप्त झाले आहे.
हंसराज अहिर यांनी या विषयाबद्दल वेकोली मुख्यालय नागपूर, क्षेत्रीय वेकोली कार्यालय येथे सतत बैठका व पत्र व्यवहार करून मोजा कोलगाव शिवेतील, कोलगाव आणि कडोली येथील शेतकऱ्यांची जमीन, बल्लारपूर नॉर्थ वेस्ट या प्रकल्पाचे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये समाविष्ट करून घेण्यात यश मिळविले. या बाबत आभार मानून येथील समस्त शेतकऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन हंसराज अहिर यांचा सत्कार केला.