रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील रहिवासी भिमराव कळमकर यांना नुकताच बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकर समाज क्रांती पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नुकत्याच कामठी जिल्हा नागपूर येथील मुस्लिम समाज भवनात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मजदुर सेना नागपूर जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय मजदुर सेनेच्या भव्य परिषदेत भिमराव कळमकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.मजदूर सेनेचे नागपूर प्रदेश सचिव विजय पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ आंबेडकरी साहीत्यीक डॉ धनराज डहाट तर कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मजदुर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगप्रसिध्द लाॉंगमार्च प्रणेता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे (सर) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे तसेच पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष कैलास बोंबले, पक्षांच्या महीला ब्रीगेडच्या महासचिव सविता नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
भिमराव कळमकर यांनी कार्यक्रमाचे आयोजक पाहूने मंडळी, सहकारी व मान्यवरांचे आभार मानले.