पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे सुशांत ऊर्फ मव्या शशिकांत कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार (टोळी सदस्य) यांनी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि. २३/११/२०२२ रोजी राजेवाडी, नाना पेठ पुणे या परीसरात जुन्या भांडणाच्या वादावरुन फिर्यादी यांचे गुलास कोयत्याने विटांनी गारहाण करून, निघृण खून करून सदर ठिकाणी दहशत निर्माण केली होती. त्याबाबत त्यांचेवर समर्थ पो स्टे २०९ / २०२२, भादविक ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९. म.पो.अधि.३७ (१) (३) १३५.क्रि. लॉ अॅमेंडमेंट क.७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचेविरुध्द शरिराविरुध्द गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान यातील आरोपी नामे १) सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर, वय २८ वर्षे, रा. ८४३. नानापेठ, राजेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) २) आदित्य राजु केंजळे, वय १८ वर्षे, रा. खडक चौक, धायरी पुणे ३) स्वरुप संतोष गायकवाड, वय १८ वर्षे. रा. २५७. गुरुवार पेठ, पुणे ४) राजन अरुण काऊंटर, वय २३ वर्षे, रा. ८४३ नाना पेठ, राजेवाडी, पुणे ५) तेजस अशोक जावळे, वय-३२ वर्षे, रा. ८५७, नानापेठ, राजेवाडी, पुणे ६) अतिष अनिल फालके, वय २१ वर्षे, रा. ८.३८, नानापेठ, राजेवाडी, पुणे ७) एक महिला वय ४४ वर्षे, रा. ८.४३, नानापेठ, राजेवाडी, पुणे (टोली सदस्य) यांना अटक करण्यात आली असुन एक विधिसंघर्षित बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये एक महिला आरोपी हिचेवरही सदर मकोका कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर आरोपी सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले असुन अवैध मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने जबरी चोरी, जीवे ठार मारणे गुन्हा करण्यासाठी कट रचणे पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले. आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी मा.पोलीस उप- आयुक्त, परि-१, पुणे, श्री. संदीप सिंह गिल यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना समर्थ पो स्टे २०९/२०२२ मादविक ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, म.पो.अधि. ३७(५) (३) १३५. कि. लॉ अॅमेंडमेंट क७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२) ३ (४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री राजेंद्र डहाळे पुणे शहर यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. सतिश गोवेकर, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा.पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त, परि-१ पुणे, श्री. संदीप सिंह गिल, मा. सहा पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश साठे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). श्री. प्रमोद वाघमारे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रसाद लोणारे, सहा. पो. फौज. दत्तात्रय भोसले, पोलीस अमलदार, प्रमोद वायकर, प्रमोद जगताप, संतोष थोरात व किरण शितोळे, हेमंत पेरणे, रहिम शेख व महिला पोलीस अंमलदार, निलम कर्पे यांनी केली आहे,
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करून संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ०८ वी कारवाई आहे.