✒️उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- संजयनगर मधील भावी युवा पिढी शिक्षीत बनविण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कडुन संजयनगर मध्ये अभ्यासिका (वाचनालय) ईमारत बांधणे साठी ६० लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
अनेक दिवसांपासून ची संजयनगर परिसरामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठीची मागणी होती की, एक सुसज्ज अभ्यासिका आपणास मिळावी तीच मागणी सर्वांच्या वतीने सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासमोर मांडली. त्याकरिता सुधीर दादा व इनामदार यांनी या मागणीसाठी पाठपुरावा करून संजयनगर मधील भावी युवा पिढी सुशिक्षित शिक्षीत बनविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक.११ मध्ये संजयनगर मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी अभ्यासिका इमारत बांधणे या करिता रु.६० लाख इतका भरघोस निधी मंजूर करून आणल्याबद्दल प्रभाग क्रमांक ११ संजयनगर मधील सर्व नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी दिपक माने संघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा