अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिलेच्या जिवाशी खेळ सुरू असून त्वरित थांबवा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक भंडारज ता. पातुर जि.अकोला येथिल रहीवासी सौ अंकीता आनंद सुरवाडे या महीलेच्या जिवाशी खेळ झाल्याचा प्रकार सर्वोपचार रुग्णालयात घडला. सदर प्रकार असा की, अंकिता आनंद सुरवाडे ही महिला आपल्या पतिसोबत तिच्या पोटदुखीचा त्रास होत होता म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दि.१६/१२/२०२२ रोजी तपासणीसाठी आली होती वार्ड नं १०९ /१०४ /१११ मध्ये तपासणी झाल्यानंतर सोनोग्राफी करायची सांगितले, सोनोग्राफी झाल्यानंतर संबंधित डॉक्टर यांनी त्या रुग्णाला सदर रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून सांगितले व १५ दिवसांचे औषधी लिहून दिले व घ्यायची सांगितले. तरीही त्या रुग्णाला पोटदुखीच्या त्रासाला काहीच आराम न पडल्याने सदर रुग्ण अंकिता सुरवाडे ही आपल्या पतिसोबत दि.२०/१२/२०२२ रोजी माहेर हॉस्पिटल येथे तपासणी करीता गेले असता तिथ सदर रुग्ण अंकिता सुरवाडे ही गर्भवती असुन तिला १५ दिवस झाले असे माहेर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले म्हणून सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिलेच्या जिवाशी खेळ सुरू असुन सोनोग्राफीचे खोटे रिपोर्ट देणाऱ्या डॉक्टर वर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांनी प्रामुख्याने लक्ष देऊन त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र यांनी सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले, रुग्ण अंकिता सुरवाडे यांचे पती आनंद सुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348