पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १२/०२/२०२३ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार, आशिष यादव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत मार्केटयार्ड गोल बिल्डींगचे मागे, एक इसम उभा असुन तो अवैध्यरित्या पिस्तुल बाळगत आहे. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता आहे अशी बातमी मिळाल्याने, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती.ए.व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक गुन्हे, श्रीमती सविता ढमढेरे यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाईबाबत सुचना देऊन, सदर इसमास ताब्यात घेवुन पुढील योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
वरीष्ठांकडुन मिळालेल्या सुचनांप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मार्केटयार्ड गाळा नं. ४२ जवळ गोल बिल्डींग जवळ सापळा रचुन आरोपी नामे सागर बबन पाटे, वय ३५ वर्षे, रा.ए/२/५, लोअर इंदीरा नगर, बिबवेवाडी, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडती मध्ये एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याचेविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करून, त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती सविता ढमढेरे, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर हया करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती. पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती. ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती सविता ढमढेरे यांचे मार्गदर्शना खाली सहा. पो. निरी. कांबळे, पो.उप निरी. शिंदे, पोलीस अंमलदार, पराळे, दिपक मोधे, पोटे, आशिष यादव, लोणकर यांच्या पथकाने केली आहे.