पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- फिनिक्स मॉल येथे यातील फिर्यादी याचे कामगारांना ट्रक मधील माल खाली करुन न देता खंडणी मागुन, मॉल मध्ये व्यवसाय करु देणार नाही अशी धमकी दिल्याने १) रविंद्र जयप्रकाश ससाणे, वय ४९ वर्षे, रा. कल्लापुरे कॉलनी, खुळेवाडी, हनुमान मंदीर शेजारी, विमाननगर, (टोळी प्रमुख) २) मंगल रमेश सातपुते वय अंदाजे ४० वर्षे, रा. धानोरी विश्रांतवाडी पुणे ३) दिपक संपत गायकवाड वय ४० वर्षे, सर्व रा. मुळा रोड, खडकी येरवडा, पुणे यांचे विरुध्द तक्रार दिल्याने विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ७७/२०२३ भा. दं. वि. कलम ३८५, ५०६, ३४ अन्वये वरील नमुद आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी नामे रविंद्र जयप्रकाश ससाणे वय ५० वर्षे रा. खुळेवाडी हनुमान मंदिराजवळ चंदननगर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशहा दाखवुन, जुलुंग जबरदस्ती करुन, जबरीचोरी करणे, सरकारी नोकरावर हल्ले करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, गंभीर गुन्हे करणे अशा प्रकारचे गुन्हे करुन सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती. नमुद आरोपी विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत. त्याचे वर्तनात सुधारणा झालेली दिसत नाही. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii).३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी मंजुरी मिळणे करीता मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विलास सोडे विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर श्री शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता..
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेची मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे व नमुद आरोपींविरुध्द मोक्का कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याची मान्यता दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा पोलीस आयुक्त श्री. किशोर जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा, गा.पोलीस उप आयुक्त श्री शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. किशोर जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मंगेश जगताप, पोलीस उप निरीक्षक श्री. एस. एस. कोठुरे व सव्हॅलन्स पथकातील पोलीस अंगलदार उमेश धेंडे, सचिन जाधव, चंदन तोडेकर, वाघुले, महिला पोलीस अंमलदार भोर यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश • देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे.