Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

वर्धा जिल्ह्यात 10 हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षनिय वाढ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 17, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्ह्यात 10 हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षनिय वाढ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील इयत्ता 5 वी व 8 वी मध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ घ्यावा आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयत्नांमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षनिय वाढ झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात 10 हजार 748 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेद्वारा दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी करिता आयोजित करण्यात येते. त्या अनुषंगाने यावर्षी इयत्ता 5 वी व 8 वी मधील सर्वच शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसावेत याकरिता शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक कर्मचाऱ्यां मार्फत विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यामुळे होणारे फायदे याचे महत्व पटवून सांगितले.

परीक्षेपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचा चांगला सराव व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांमध्ये अभिरुप पद्धतीने सराव परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबाबत जिल्हास्तवरून ओएमआर शिट पुरवून सराव परीक्षा घेण्यात आली. या सरावामुळे विद्यार्थ्यांना इतरही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मोठी मदत झाली, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.
बहूतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची फी भरण्यास येणाऱ्या आर्थिक अडचणींचा साकल्याने विचार करुन जिल्हा परिषद शाळांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेस बसविण्याचा निर्णय घेतला आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या फी ची तरतूद जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून करण्यात आली.

या सर्व प्रयत्नांमुळे इयत्ता 5 वी मधील 6 हजार 381 व इयत्ता 8 वी मधील 4 हजार 367 अशा एकूण 10 हजार 748 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यां च्या संख्येत लक्षनिय वाढ झाली म्हणजेच विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग घेतला असल्याचे दिसून येते. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून परीक्षापुर्व नियोजनामुळे शिक्षण विभागाला ही परीक्षा लक्षनिय विद्यार्थ्यांसह घेणे शक्य झाली.

या शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी प्राथणिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे प्राचार्य, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक कर्मचारी तसेच जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अभिनंदन केले.

Previous Post

Osoba Przyjmująca Zakłady Sportowe Hasło Do Krzyżówk

Next Post

राजुरा: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन.

राजुरा: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In