✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दि 17 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपुर परिसरातील मौजा शिवणी पारधी बेड़ा येथे वॉश आउट मोहीम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या पडीत शेत शिवारात जमिनीत गाडुन असलेले व झुडपात लपवुन ठेवुन असलेले 24 लोखंडी ड्रम व 47 प्लास्ट्रिक ड्रममध्ये अंदाजे 5,950 लीटर कच्चा मोहा सड़वा रसायन प्रति लीटर 50 रु प्रमाने 2,97,500 रु, 24 लोखंडी ड्रम प्रती ड्रम किं. 500 रू. प्रमाणे 12,000 रू., 47 प्लास्ट्रीक ड्रम प्रती 300 रू प्रमाणे 14,100 रू, व 24 प्लास्टीक कॅनपैकी 07 कॅनमध्ये प्रती कॅन अंदाजे 35 ली प्रमाणे एकुण 245 ली गावठी मोहा दारू प्रती ली. 100 रू. प्रमाणे 24,500 रू. व 24 कॅन प्रती कॅन किं 200 रू. प्रमाणे 5,600 रू. व एक जर्मन घमेला किं. 1000 रू. असा एकुण जु.किं. 3,54,700 रू. चा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन व मोहा दारू चा माल मिळुन आला असुन, सदरचा माल हा आरोपीता नामे 1) ईकावती चंदास पवार, वय 38 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 2) अनु सुनिल काळे, वय 56 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा तह. समुद्रपूर, 3) शारदा जुजाब पवार, वय 45 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा तह. समुद्रपूर, यांचे मालकिचा असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही व सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपुर्ण मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला असुन, तिन्ही आरेापीतां विरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश कदम यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे मार्गदर्शनात स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे चा.पो.हवा. कृष्णा इंगळे व 13 होमगार्ड सैनिक यांनी केली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348