विध्यार्थीनी अथक परिश्रम घेऊन नावलौकिक मिळवावे.- सतीश धोटे
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 25 फेब्रुवारी:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचलित राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल येथील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे, अध्यक्ष, बा. शी. प्र. मं. होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख, स्काऊट लीडर बादल बेले, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक नवनाथ बुटले, मेघा वाढई आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी गीत, शाळेतील अनुभव व परीक्षेच्या तयारीविषयी आपले मनोगत सादर केले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी भेट शाळेला साउंडबॉक्स भेट दिला. आपल्या मनोगतातून विद्यार्थी, शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परिक्षा व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटीने शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून आपले ध्येय साकार करा असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता इयत्ता नववी चे वर्गशिक्षक प्रशांत रागीट, आशा बोबडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्विंकल हेपट आणि वैष्णवी कोरडे यांनी केले. आभार प्रदर्शन साक्षी तोडासे यांनी तर प्रास्ताविक वर्गशिक्षक प्रशांत रागीट यांनी केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348