पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:-दि.२३.०२.२०२३ रोजी गुरूवार पेठ खडक पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अगंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १६ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण २९,३७०/- रू किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा १७ इसमांविरूध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुरनं ७८ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर इरफान पठाण, इम्रान नदाफ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

