विनोद गोपाल ठमके, विरुर स्टेशन प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेत शिवारात विज पडून ७ जन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याची माहिती कळताच माजी आमदार अँड संजयभाऊ धोटे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन त्याची विचारपूस केली व त्वरित उपचार सुरू करण्यास सांगितले.
सदर घटना ही दुपारी एक वाजता चे दरम्यान झाली असुन मधुकर धानोरकर यांच्या शेतात स्वतः पत्नी सह १५मजूर काम करित होते.अचानक पाऊसाचा आगाज होऊन विज गर्जना होऊन विज पडली त्याना त्वरित राजुरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यात मधुकर धानोरकर, उषाताई सुरेश चौधरी, किरणताई पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भास्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मुनाल शेषराव बोबडे, अर्चना धानोरकर, अर्चना सुनील चौधरी याना उपचारासाठी दाखल केले. यासह ईतर व्यक्ती ना सुध्दा ईजा झाल्याचे कळले. अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे. वादळी पावसाबरोबरच विजांचा कडकलात होत असल्याने शेतकऱ्यांना सुद्धा आपले जीव धोक्यात घालून शेतात काम करावे लागत आहे .