Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वाशिम: शेती शाळेतून दिली पीक लागवड तंत्रज्ञान ते पीक कापणीची माहिती 255 शेतीशाळेतून 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वाशिम: शेती शाळेतून दिली पीक लागवड तंत्रज्ञान ते पीक कापणीची माहिती 255 शेतीशाळेतून 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम दि.28:- जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते.काही शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोता वरून संरक्षित सिंचनाची व्यवस्था करतात. जिल्ह्यात सोयाबीन हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी व त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घ्यावे हा शेती शाळे मागचा उद्देश आहे. सन 2022 – 23 या वर्षात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन ते पीक काढणीबाबतच्या खरीप आणि रब्बी हंगामात एकूण 255 शेतीशाळा घेण्यात आल्या. या शेती शाळेमध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कृषी सहायकांनी 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

खरीप हंगामात 174 शेतीशाळा घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असता 159 शेती शाळा घेण्यात आल्या. यामध्ये 4 हजार 770 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या शेतीशाळेतून शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन बीज प्रक्रिया याबाबतची माहिती देऊन घेण्यात येणाऱ्या पिकांच्या वेळेनुसार तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप हंगामातील शेती शाळेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन पिकांच्या 13, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तूर पिकाच्या 15, राज्य पुरस्कृत मूल्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाच्या 20, कापूस पिकाच्या 8, पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात क्रॉप सॅप अंतर्गत तुर पिकाच्या 3,पोकरा योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस पिकांच्या 68, आत्माअंतर्गत सोयाबीन, तूर,रेशीम,हळद, जीरानियम, सेंद्रिय तुर, भाजीपाला, संत्रा कापूस, कृषी प्रक्रिया आणि सेंद्रिय निविष्ठा अंतर्गत 32 शेती शाळा घेण्यात आल्या.

रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 14, आत्मा अंतर्गत 10, पोकरा अंतर्गत 31, क्रॉप सॅपच्या 12 अशा एकूण 67 शेती शाळा घेण्यात आल्या. रब्बी ज्वारीच्या 2 आणि आत्माअंतर्गत इतर पिकांच्या 11 शेतीत शाळा घेण्यात आल्या.

शेतीविषयक पिकांची लागवड, कीड व्यवस्थापन, आंतर मशागतीची, बीज प्रक्रियांची माहिती शेतकरी महिलांना व्हावी तसेच कृषी क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने पुढे याव्यात यासाठी यावर्षीच्या रब्बी हंगामात महिलांसाठी 16 शेती शाळा घेण्यात आल्या. यातील एक शेती शाळा राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, 7 शेती शाळा आत्मा,5 शेती शाळा पोकरा आणि तीन शेती शाळा क्रॉप सॅप अंतर्गत घेण्यात आल्या.

खरीप हंगामात वाशिम तालुका – 14, रिसोड तालुका – 24, मालेगाव तालुका – 15,मंगरूळपीर तालुका – 17, मानोरा तालुका – 61 आणि कारंजा तालुक्यात 25 अशा एकूण 159 शेती शाळा घेण्यात आल्या. कृषी विभागाचे तज्ञ अधिकारी ते कृषी सहायक यांनी वरील दोन्ही हंगामातील कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान एकात्मिक कीड व्यवस्थापन ते पीक कापणीबाबतचे मार्गदर्शन केले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना तसेच शेती शाळेला उपस्थित शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी या शेती शाळेचा निश्चितच उपयोग होणार आहे.शेती शाळेमुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे.

Previous Post

वाशिम अंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने एकदिवशीय दुरूस्ती शिबीर संपन्न.

Next Post

पिंपरी येथे सफाई कर्मचारी महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मागविला कारवाई अहवाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पिंपरी येथे सफाई कर्मचारी महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मागविला कारवाई अहवाल.

पिंपरी येथे सफाई कर्मचारी महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मागविला कारवाई अहवाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In