तथागत भगवान बुद्धाचे मानवहिताचे कार्य उपकारक पुज्य भंते यश कशपायन
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने श्रावस्ती विहार येथे चैत्र पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. चैत्र पौर्णिमा ही तथागत भगवान बुद्धाच्या जीवनातील महत्वपुर्ण पौर्णिमा पैकी एक आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरवात तथागत बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून व बुद्धवंदना घेऊन करण्यात आली. त्यानंतर पुज्य भंते यश कशपायन यांनी चैत्र पौर्णिमेच्या निमिताने धम्मदेसना दिली. यावेळी भंतेजी म्हणाले बुद्धाचा धम्माचा पाया दया, क्षमा, शांती, शील, सदाचार, नीतीमता आणि मैत्री यावर आधारित आहे. बुद्धाच्या केंद्रस्थानी मानवता असून बहुजन हिताय बहुजन सुखाय या वर आधारलेली असून बुद्धाची शिकवण मनुष्याला उपदेश मानवी समाजाला आनंदाने जगण्यास उपयुक्त आहे.
यावेळी येथे मोठ्या प्रमाणात उपासक आणि उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.