✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नैसगिक आपत्ती आली कि त्यावर मात तर करू शकत नाही परंतु मानव निर्मित वस्तू तयार करून त्यावर नियंत्रण करू शकतो तसे या ठिकाणी आहे. गेला वर्षी अति पाऊसामुळे हिंगणघाट मधील जुनी वस्ती मध्ये लोकांचा मालमत्तेचे खूप नुकसान झाले. अति वृष्टीमुळे धरण भरली आणि हिंगणघाट शहर मधील नाल्यात येणारे सांड पाण्यामुळे दाब निर्माण झाली यावर सविस्तर निरक्षण करून जेव्हा खूप पाणी आले कि धरणे भरून नदी भरून नाले भरून जात होते यामुळे पाणी स्थिर रहाचे म्हणजे पाणी समोर नाही जाने अशी परिस्थिती उत्पन्न झाली कि धरणाचे पाणी सोडले जात होते आणि नदीला पूर यायचे यामुळे हिंगणघाट शहर मधील सांड पाणी कुठे जायचे? कारण शोधता हिंगणघाट शहरात मोठा नाला 12 फुटाचा तो पिली मस्जिद पर्यन्त आहे आणि पिली मस्जिद ते वना नदी पर्यन्त 4 फुटाचा नाली असल्यामुळे त्या ठिकाणी दाब जास्ती झाला कि , शहरातून येणारे सांड पाणी 12 फुटाचा मोठा नाल्यातून पाणी 4 फूटाचा नाली मधून कसा जाणार ही खरी समस्या या ठिकाणी निर्माण होते.
या करिता शिवसेना ची अशी मागणी आहे कि भविष्यात लोकांचा मालमत्तेचे नुकसान झाले नाही पाहिजे या करिता पिली मस्जिद पासून ते वना नदी पर्यंत 12 फुटाचे मोठा नालाचे लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे या करिता मुख्यधिकारी साहेब हिंगणघाट नगरपालिका यांना निवेदन दिले यात प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रमुख श्री रवीभाऊ धोटे, सौं धनश्री क्षीरसागर महिला उपजिल्हा प्रमुख,श्री महेश मुडे युवासेना उपजिल्हा प्रमुख,श्री अमित भाऊ गावंडे तालुका प्रमुख,श्री प्रफुल क्षीरसागर शहर प्रमुख श्री मुकेश चौधरी शहर संघटक,श्री देवाभाऊ शेंडे उपशहर प्रमुख, श्री मनोज कोटकर उपशहर प्रमुख, श्री प्रशांत कंडे विभाग प्रमुख,श्री संजय जुमडे विभाग प्रमुख, सेवक खैरे प्रशांत वीरूळकर, सचिन मिठोले,प्रमोद जुमडे,मंगला खराटे, रेणू खेकडे, अनिता वैरेकर यादी उपस्थिती असून वॉर्डातील 100 लोकांनी निवेदन मध्ये सही केली.