वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय पर्व अंतर्गत बार्टी मुख्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार (निबंधक बार्टी) सत्येंद्रनाथ चव्हाण (विभाग प्रमुख विस्तार व सेवा, IBPS), विभाग प्रमुख, श्रीमती स्नेहल भोसले, श्रीमती शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बार्टी मुख्यालय ते डॉ.बाबसाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत समता रॅली काढण्यात आली.

सदर रॅली मध्ये निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, विभाग प्रमुख सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती भोसले, श्रीमती शिंदे, कार्यालय अधीक्षक, सचिन जगदाळे, श्रीमती नारखेडे, श्रीमती मोहिते, सहा. प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी बार्टी मुख्यालयाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, पुणे शहर समतादुत श्रीमती कीर्ती आखाडे, समतादूत श्रीमती तेजस्विनी कांबळे,
येरवडा शाळेचे शिक्षक, येरवडा संकुलचे कर्मचारी आदी सहभागी झाले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व विभाग प्रमुख, कार्यालयीन अधिक्षक, प्रकल्प व्यवस्थापक व सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक यांचे द्वारे अभिवादन करण्यात आले.

