पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक १५/०४/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे उबेद कादर भाई चौक, रास्ता पेठ, पुणे येथील मोबाईल शॉपीचे दुकानात असताना, यातील नमुद आरोपी १) अमान इब्राहीम खान, वय-२१ २ ) हमजा तसवर शेख, वय १९ ३) हाफीज उर्फ हुजेफा इसाक शेख, वय-२१ ४) मोहंमद वसीम खान वय १९, सर्व रा. सत्तार चाळ, नाना पेठ, पुणे यांनी दुकानात येवुन, हमको गोवा जानेका है पैसे दो नहीं तो मुंह फोडके और दुकान फोड देंगे अशी धमकी देवून ईद राणासाठी खंडणी वजा वर्गणी मागितली यावर फिर्यादी व त्यांचा भाऊ यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सदर आरोपी यांनी शेजारी असलेल्या गॅरेज मधील पान्हयाने फिर्यादी याचे डोक्यात व हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा भाऊ यास पान्हे फेकून मारल्यामुळे त्यांचे दुकानाचे नुकसानही झाले होते. सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन गुरनं. १५/२०२३ भादविक ३२६.३२४, ३८७, ४२७,३४,महा.पो.का.क.३७(१) (३) १३५ अन्वये खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास तात्काळ समर्थ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे पथकाने सुरु करुन खंडणीखोरांना दोन तासाचे आत जेरबंद करण्यात तपास पथकाला यश आले आहे. त्यानंतर आरोपी हे तेथुन पळुन गेले. समर्थ तपास पथकाचे सपोनि प्रसाद लोणारे यांनी तात्काळ दखल घेत आरोपी यांना दोन तासाचे आत अटक केली असुन मा न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसाद लोणारे हे करीत आहे.
अशा प्रकारे कोणीही जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागीतल्यास तात्काळ : पोलीसांना संपर्क करावा असे आवाहन मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ- १ श्री. संदीपसिंह गिल यांनी केले आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर, श्री. संदीपसिंह गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो. स्टे, श्री. रमेश साठे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, रिकी भिसे, शरद घोरपडे, मंगेश जाधव, संदीप पवार, प्रफुल्ल साबळे, रोहीदास वाघेरे यांनी केली आहे.