युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर ब्राह्मणी येथे गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक धार्मिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातअग्रेसर असणारे नेते सर्जुभाऊ मंडपे यांच्या नेतृत्वामध्ये समता रॅलीचे आयोजन मोठ्या थाटामाटाने केल्या जाते. यावर्षी पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या महान थोर पुरुषांची संयुक्त जयंती निमित्त समता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रारंभी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्यमाला अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी ब्राह्मणी ग्रामपंचायत चे माजी सदस्य संजय काकडे, समता सैनिक दलाचे विठ्ठलराव जनबंधू, रिपब्लिकन पक्षाचे रामदासजी कापसे, गेल्या 16 वर्षापासून ही समता रॅली बाबासाहेब गौतम बुद्धाच्या, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व इतर थोर पुरुषांच्या जय जय कार , जयघोषणेच्या आवाजात नगरी दुमदुमून जाते. त्याचप्रमाणे फटाक्याची आतिषबाजी, निळ्या गुलालची उधळण, डीजेच्या तालावर तरुणांचे पाय थिरकत होते समता रेली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा केटीएम मॉलच्या समोरून प्रारंभ होऊन पंचायत समिती ते शिक्षक कॉलनी बुद्ध विहार ते केटीएम हाल ते त्रिरत्न बुद्ध विहार ते पोलीस स्टेशन मार्गे रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बस स्टॅन्ड मार्गे बाजार चौकातून बायपास मार्गे महासूर्य बुद्ध विहार कळमेश्वर येथे समापन करण्यात आले. या प्रसंगी नगर परीषद कळमेश्वर च्या माजी उपाध्यक्षा ज्योत्स्ना ताई मंडपे, बहूजन नेते सरजु मंडपे , युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ, सत्यवान मेश्राम माजी नगर सेवक , पत्रकार युवराज मेश्राम, भारती बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस राहुलजी वानखेडे, तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना उके , कोषाध्यक्ष दर्शना झामरे, उपाध्यक्षा लताताई खडसे तर कार्यकारणी सदस्य सुलोचना वाहने, नंदा भंडारे, राजकन्या पाटील,भारती बनसोड इत्यादि महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन अरुण भाऊ वाहने तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले. प्रभुजी कराडे यांनी सामूहिक वंदना घेण्यात आली या वेळी कळमेश्वर येथील पोलिस निरीक्षक यशवंत सोलशे यांनी चोक बंदोबस्त ठेवणयात आला व त्याच प्रमाणे भोजनाने कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली