अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथे जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्य प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम तथा नागरी सत्कार समारंभ मानवतावादी विचारांचा महासंग्राम राष्ट्रीय दुय्यम गमतीचा जंगी सामना राजकीय आदर्श निशाण शाहीर पुरुषोत्तम खांडेकर व संच परसार तालुका- कामठी जिल्हा-नागपूर, तसेच प्रबोधनकार वैभव सांस्कृतिक कला मंडळ शाहीर निनाद बागडे नागपुर व त्यांचा संच यांचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्टँड जवळ सावनेर येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.निळकंठ यावलकर तर अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीचे अभ्यासक डॉ.अभिविलास नखाते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय धोटे, सुरेशबाबू डोंगरे, शामराव डांबरे, बबलू भाऊ मेश्राम, शैलेश निकम, संदीप भोंगाडे, विजयजी मुसनवार, राजेंद्र चवडे व सुनिता नखाते होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती युवराज मेश्राम विदर्भ चीफ ब्युरो महाराष्ट्र संदेश न्यूज, पत्रकार अनिल अडकिने, सिद्धार्थ मांडवे, पांडुरंग भोंगाडे, मनोहर सोनटक्के,अशोक गायकवाड, सुभाष साळवे, शकील झेडिया, उत्तमजी रागासे, राहुल वानखेडे, खुशाल छत्रे, चंद्रकांत कापसे, अनिरुद्ध बोराडे, संजयजी टेंभेकर, गणपती पठाणे, संजय चौधरी, समीर लाडसे, दशरथ साळवे, शांताराम ढोके, पंकज अडागळे, सुरेश मारोतकर, उमेश गणोरकर, पुरुषोत्तम ढोके, राजु सोनटक्के, अखिलेश गायकवाड, प्रतिभा कड्डक, पवन लांबट, अर्णव पंकज गायकवाड, मनीष शेंडे, जीवन बागडे, नथूजी तागडे, सौ. रत्नमाला रागासे, व सौ. मायाबाई चांदेकर आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन भगवान चांदेकर संस्थापक अध्यक्ष जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटना यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघटनेचे विदर्भ प्रभारी महेंद्र सातपुते यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजेंद्र नवघरे, गोपाल धोटे, पंकज गायकवाड, नरेश सोनबरसे, सिद्धार्थ मांडवे व राजकुमारजी चांदेकर आदींनी परिश्रम घेतले.