डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय महिने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. ही महिला पोलीस चौकीतील बाथरूम मध्ये शौचालयास गेले असताना तेथील लोखंडी ग्रीलला स्वेटरने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील गुंतागुंत पाहता या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
ही घटना निगडी पोलीस ठाणे अंतर्गत ओटा स्कीम पोलीस चौकीत सोमवार (ता.१७)रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार एका १४ वर्षे मुलीचे अपहरण झाले असल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात बुधवार तारीख १२ एप्रिल रोजी नोंद झाली होती. फिर्यादी असलेल्या मुलीच्या वडिलांनी मुलीला घेऊन जाणाऱ्या एका २९वर्षे महिलेवर संशय व्यक्त केला होता. काही महिन्यापूर्वी या महिलेची आणि मुलीची गोवा येथे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले होते.ही मुलगी तिच्या गोव्यात राहणाऱ्या नातेवाईकांकडे त्यावेळी गेली होती.
काही दिवस गोव्यात राहिल्यावर ही १४ वर्षे मुलगी आपल्या घरी (निगडी) येथे परत आली. आपल्या मैत्रिणींला शोधण्यासाठी ती महिला गोव्यावरून या १४ वर्षे मुलीला आपल्या सोबत जळगाव येथे घेऊन गेली. काही दिवसांनी त्या दोघी अहमदनगर येथे आल्या. अहमदनगर येथील बाल समिती सदस्यांना या दोघी बाबत संशय आल्याने त्यांनी या दोघींची व विचारपूस करून दोघींची माहिती स्थानिक कोतवाली पोलिसांना दिली. कोतवली पोलिसांनी दोघी बाबत माहिती निगडी पोलिसांना कळविली. निगडी पोलिसांनी या दोघींना रविवारी (ता.१६) रोजी निगडी येथे आणले. तेथे या महिलेने शौचालयात जाऊन आत्महत्या केली. या प्रकारचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार आहे.
संबंधित महिलेला पोलिसांनी रविवार ता. १६ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. तिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता होती. परंतु तसे झाले नाही. निगडी ते ओटास्कीम येथील पोलीस चौकी येथे तिला रात्रभर ठेवण्यात आले. दरम्यान तिथे एक महिला पोलीस कर्मचारी हजर नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संपूर्ण रात्र तिने पोलीस चौकीत काढली मग … त्या रात्री नेमकी असं काय घडलं? की, तिने इतके मोठे टोकाचे पाऊल उचलले…. आणि दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली?असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित राहत आहेत. पोलीस तपासामध्ये सत्यसमोर येईल आणि त्याला न्याय मिळेल. अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.