पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
पिंपरीचिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०६/०४/२०२३ रोजी सकाळी ०६.३० वा. चे सुमारास चाकण पोलीस ठाणे हददीत मौजे शेलपिंपळगाव येथे लग्नास नकार दिल्याचे कारणा वस्त फिर्यादी आरती हंसराज मराठे यांचा सव्वा वर्षचे मुलास आरोपी नामे विक्रम शरद कोळेकर याने बाथरूम मध्ये गरम पाण्याचे बादली मध्ये बुडवील्याने त्या मध्यो लहान बालक गंभिररित्या भाजल्याने त्याचेवर ससून हॉस्पीटल, पुणे या ठिकाणी उपचार चालु असताना दिनांक १८/०४/२०२३ रोजी मयत झाल्याने फिर्यादीने चाकण पो.स्टे. गु.र.नं. ३९६/२०२३ भा.दं.वि. कलम ३०२,५०६ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
चाकण पोलीस स्टेशन हददीतील शेलपिंपळगाव येथील लहान बालकाच्या खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने त्यातील आरोपीस तात्काळ ताब्यातघेणे बाबत आम्ही गुन्हे शाखा युनिट ३, कडील वपोनि शैलेश गायकवाड यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यातघेउन सदरचा गुन्हा उघडकीस आणने बाबत मार्गदर्शन व सुचनादिल्या होत्या श्री शैलेश गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ यांनी दोन वेगवेगळ्या टिम तयार करू न योग्यत्या सुचना देउनएका टिम मध्येते स्वतः सोबत पो.ना. १६६६ मालचिम पो.शि. २२७३ दांगट, पो.शि. २८७७ मेरगळ, पो. शि. २००१ नांगरे असे आरोपी रहात असलेल्या कोयाळी परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होते व दुस-या टिम मधील पोलीस उपनिरीक्षक गिरीशचामले, पो. हवा. ७५५ आवारी, पो.शि. १२८१ कोळेकर, पो.शि. २८९५ फापाळे, पोशि २८८३ काळे असे बहुळवाकण परिसरात पाठवुन सदर आरोपीचा शोध घेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे टिमला बातमी मिळाली की सदरचा आरोपी हा बहुळ परिसरात येणार असले बाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांनी दुसरी टिम बहुळ परिसराचे जवळच असल्याने त्या टिमला तात्काळ सदर ठिकाणी पाठवुन सापळा रचुन आरोपी विक्रम शरद कोळेकर वय २३ वर्षे रा. कोयाळी ता.खेड जि.पुणे यास शिताफीने ताब्यात घेउन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने सदर आरोपीची वैदयकीय तपासनी करू न आरोपीस रिपोर्टसह चाकण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोठिया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती. स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे अतिरीक्त कार्यभार) श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, महेश भालचिम, ऋणीकेश भोसुरे, योगेश कोळेकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समिर काळे, निखल फापाळे, रामदास मेरगळ, राजकुमार हनमंते, राहुल सुर्यवंशी यांनी केली आहे.