जाहीद खान पुणे शहर प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हेशाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन पुणे :- मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. श्री. संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच अवैध धंदयाबाबत माहिती काढुन कठोर कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण बेंगळे, व पोलीस अंमलदार हे चंदननगर पो.ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस हवालदार मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काही इसम हे खराडी चौकातुन रक्षकनगरकडे जाणा-या सार्वजनिक रोडवर स्नेहदिप सोसायटी लगत स नं ४/१/ पंढरीनगर, खराडी पुणे या ठिकाणी मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत मनोजकुमार साळुंके व मारुती पारधी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळविले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफसह मिळालेल्या बातमीतील ठिकाणी सापळा रचुन थांबले असता त्या ठिकाणी तीन इमस संशयीतरीत्या मिळुन आल्याने त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे ०१) आजाद शेरजमान खान, वय ३५ वर्षे रा पिपलखेडी ता अलोट – जि. रतलाम मध्यपद्रेश थाना बरखेडाकला ०२ ) नागेश्वर रामेश्वर प्रजापती वय ३५ वर्षे रा ता आलोट जि – रतलाम मध्यप्रदेश गाव खजुरी देवडा थाना आलोट व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे ताब्यात कि.रु.२.२१,९२,५००/- चा ऐवज त्यामध्ये ०१ किलो १०८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ कि रु २,२१,६०,०००/- चा एकुण चार मोबाईल फोन ३१०००/- रु कि चे रोख रुपये १०००/- एक लाल रंगाची सॅक बॅग कि रु ५००/- रु ची एक ट्रॅव्हल तिकीट असे अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २२ (क). २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. श्री. सुनिल पवार, सहा पो आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पो निरीक्षक लक्ष्मण बेंगळे, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते, संदेश काकडे, यांनी केली आहे.

