डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- रिक्षा चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून रिक्षा चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणल्या असून एकूण ०६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिलीप कुमार शालिग्राम विश्वकर्मा वय २४ वर्ष रा. ठोंबरे चाळ पॅरिस कॉलनी नं.१ तापकीर नगर, काळेवाडी पुणे असे अटक केलेले रिक्षा चोराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटना पाहता पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी यांना वाहन चोरी उघड करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी तपास पथकातील सहाय्य पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण व तपास पथकातील अंमलदार यांची पथके तयार करून आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या.
दरम्यान तपास पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार विभीषण कनहेरकर यांना माहिती मिळाली की ,वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार दिलीपकुमार विश्वकर्मा हा काळेवाडी परिसरातील लकी बेकरी येथे येणार आहे वरिष्ठ अधिकारी यांना या संदर्भात माहिती दिली .सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे स्वतःच तसेच उपनिरीक्षक सचिन चव्हाण तसेच तपास पथकातील पोलिस अंमलदार यांना घेऊन काळेवाडी येथील लकी बेकरी येथे सापळा लावून थांबले. मिळालेल्या माहितीप्रमाणे दिलीप कुमार विश्वकर्मा हा काळेवाडी चौकात येतात दबा धरून बसलेल्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले .पथकाने त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चोरीच्या ०३ महिन्यांची कबुली पोलीसांना दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून एकुण ०६ लाख रुपये किमतीच्या वाकड पोलीस स्टेशन ०२ चतुर्शिंगी पोलीस स्टेशन ०१ अशा ०३ रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण ,सहाय्यक पोलीस फौजदार विभीषण कनेरकर बाबाजान इनामदार राजेंद्र काळे, पोलीस हवालदार वंदु गिरे, संतोष बर्गे, संदीप गवारी, दीपक साबळे, स्वप्निल खेतले, आदेश जाधव, प्रमोद कदम, पोलीस नाईक अतिक शेख,विक्रांत चव्हाण, राम तळपे ,प्रशांत गिलबिले, पोलीस शिपाई तात्या शिंदे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर यांच्या पथकाने मिळून ही कारवाई केली आहे.

