✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला व्हावे याकरिता संघर्ष समितीचा धरणे आंदोलन हिंगणघाट तालुका प्रतिनिधी. वर्धा जिल्ह्यात होऊ घातलेले नियोजित शासकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे याकरिता दिनांक 11 मे गुरुवारपासून संघर्ष समितीने येथील एसडीओ कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले असून या संबंधात संघर्ष समितीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा शासन स्तरावर झाली आहे. वर्धा जिल्ह्याचा त्याच्यात समावेश आहे. वर्धेत अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावर खाजगी क्षेत्रातील सेवाग्राम येथे कस्तुरबा मेडिकल कॉलेज व सावंगी मेघे येथे आचार्य विनोबा भावे मेडिकल कॉलेज असून वर्धेत शासकीय जिल्हा रुग्णालय व नर्सिंग कॉलेज आहे. परंतु हिंगणघाट शहर रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग वर असून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळी असल्याने सतत अपघात होतात. गंभीर दुखापातग्रस्त लोकांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचवू शकतो. त्याकरिता येथे वैद्यकीय महाविद्यालय मागणी आहे. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याची लोकसंख्या तीन लाख सहा हजार 240 असून त्या तुलनेमध्ये रुग्णालयात खाटांची संख्या कमी आहे. लोकसंख्याच्या तुलनेमध्ये हे समीकरण जुळत नाही. तसेच गरोदर माता रुग्णाची संख्या वर्धेपेक्षा हिंगणघाटला अधिक असून पन्नास टक्के माता रुग्णांना अडचणीच्या वेळी अन्य ठिकाणी जाऊन प्रसूती करावे लागतात बरेचदा अशा वेळी उपचाराअभावी बाळ व माता दगावल्या आहे. याच्या व्यतिरिक्त पंतप्रधान मातृवंदना योजनेत वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट राज्यात दुसऱ्यांदा अव्वल क्रमांकावर आला आहे. तसेच हिंगणघाट शहराच्या सीमेलगत दोन जिल्ह्याच्या गावे जोडली आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती चा विदर्भ सहा संपूर्ण राज्यात वर्चस्व आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता हिंगणघाट येथे शासकीय महाविद्यालय द्यावे ही शासनाला आमची विनंती आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे याकरिता अगोदर हिंगणघाट बंदचा आंदोलन झाला आहे. आता धरणे आंदोलन सुरू झाले आहे या धरणे आंदोलनाला सुनील पिंपळकर, राजू चौधरी, रुपेश लाजुरकर, वासुदेव पडवे, प्रवीण कडू, जगदीश वांदिले, चेतन वाघमारे, संदेश मुन, राजेंद्र डागा, अक्षय बेलेकर, अनिल भोंगाडे, राजू खुपसरे, नवल मानधनीया, बाला टेंभुर्णे, पंकज भोगाडे, राजू सातपुते, अशोक डालिया, राहुल राठी, विकास मोटवानी, सतीश धोबे, पराग मुळे, अमोल बोरकर, मुरली लाहोटी, दशरथ ठाकरे, विनायक भिसे, राजू मुळे प्रवीण काळे, नयन निखाडे, सुनील आष्टीकर, शिखरचंद मुनोत, सुनील आष्टीकर, गौरव तीमांडे, महेश अग्रवाल, श्याम इडप्पवार, ज्वलंत मुन, चंदा येलेकर, विद्या गिरी, सीमा मग, वैशाली बनकर, माधुरी माळेकर, कल्पना हीवज, सुनिता सेनाड, सीमा मेश्राम, राजश्री बांबोडे, गीता मेश्राम, सोनाली लसणे, सोनाली चिताडे, दिपाली माकोडे, अश्विनी चौधरी, अश्विनी वाट, अंजुम शेख, नीलिमा पाटील, जनेफर शेख, नीतू सुपारे, राणी झाडे हे संघर्ष समितीचे कार्यकर्ते धरणे आंदोलन मध्ये सहभागी झाले आहे. यानंतर सुद्धा शासन स्तरावर हिंगणघाट बद्दल विचार न केल्यास संघर्ष समिती मोठे आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

