Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गळा चिरून हत्या; तिचा मित्रही गंभीर जखमी अवस्थेत पडून…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गळा चिरून हत्या; तिचा मित्रही गंभीर जखमी अवस्थेत पडून…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️अमरावती जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथ प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरून हत्या करण्यात आली. या विद्यार्थिनीचा मृतदेहाजवळ तिचा मित्रही जखमी अवस्थेत पडून होता. या मित्रानेच सदर विद्यार्थिनीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली.

काय आहे घटना…
10 मे बुधवार ला सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास बडनेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडुरा गावात ही घटना घडली. संजना शरद वानखडे वय 19 वर्ष, रा. कांडली, परतवाडा असे हत्या करण्यात आलेल्या युवतीचे नाव असून तिचा मित्र सोहम गणेश ढाले वय 19 वर्ष, रा. तुळजापूरगढी हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजना व सोहम दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहत होते. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास दोघेही संजनाच्या दुचाकीने निघाले होते. दिनाक 10 मे ला सकाळी युवतीच्या मृतदेहाशेजारीच जखमी अवस्थेत पडून असलेल्या सोहमने आरडाओरड केल्याने काही लोक जमले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता बघता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सोहम ढाले याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मृत युवतीच्या गळ्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने दोन वार केल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त हातावर सुद्धा जखमा होत्या, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी दुचाकी आढळली. ती दुचाकी मृत युवतीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. युवतीची हत्या नेमकी कशातून झाली. युवकावर कुणी वार केले, याबाबत सुरवातीला संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु तपासाअंती मृत युवतीचा चुलत भाऊ अमित दिलीप वानखडे वय 37 वर्ष यांनी बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. त्या आधारे पोलिसांनी सोहम ढालेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितले. दोघेही एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या सेकंड सेमिस्टरला शिकत होते.

हल्ला झाल्याचा बनाव
आमच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला, असे जखमी सोहमने पोलिसांना सांगितले. सोहमने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो व संजना वडुरा येथे बोलत असताना अचानक तेथे दोन जण आले. त्यांनी सोहम व संजनाशी वाद घातला व नंतर एकाच वेळी हल्ला केला.

संजनाला दिली होती धमकी..
संजना व सोहम यांच्यात एक वर्षापासून ओळख होती. परंतु सोहमच्या त्रासामुळे ती त्याच्याशी ब्रेकअप करणार होती. परंतु सोहम त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो संजनाला मानसिक त्रास देत होता. फसविण्याच्या व जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या देत होता, असे संजनाच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Previous Post

खासदार अशोक नेते व अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेटीने ‘अहेरी विधानसभा क्षेत्रात कहीं खुशी तर कहीं गम.

Next Post

पुणे: कोयत्याने वार करून खून व दहशत माजवणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: कोयत्याने वार करून खून व दहशत माजवणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड.

पुणे: कोयत्याने वार करून खून व दहशत माजवणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In