पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- ” पिंपरी चिंचवड येथील पंचताराकीत हॉटेल मध्ये काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली.
त्यानंतर अशा दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक १५/०५/२०२३ रोजी सापळा रचून बनावट ग्राहका करवी वैश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता दलालाने वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल येथे रूम बुक करण्यास सांगितल्या. त्यानंतर सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, दलाल हा जवळच आजुबाजुच्या परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून दोन पिडीत महिला व एक दलाल (आरोपी) मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४६२/२०२३ मादवि कलम ३७० (३), ३४ राह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४.५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदरची एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग करीत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे सो मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. राजय शिंदे सौ. मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, मा. साह.पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर सो.यांच्या आदेश व मार्गदर्शनखाली अनैतिक मानव वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुवा टोके, भगवंता मुठे, मारुती करबुडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली आहे…

