Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीला यश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दखल, संविधान कलोडे चौकात व सरकारी दवाखाना चौकात उड्डाणपूल मंजूर..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीला यश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दखल, संविधान कलोडे चौकात व सरकारी दवाखाना चौकात उड्डाणपूल मंजूर..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सात दिवसाच्या आत मार्ग काढण्याची राष्ट्रवादीने केली होती मागणी, पुढील तिन महिन्यात होणारं पुलाच्या निर्माणाचे काम सुरू.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग न. 7 वर संविधान (कलोडे) चौकात 4 मे रोजी अपघातात दोन अल्पवयीन युवकांना आपला जीव गमवावा लागला होता. या चौकात सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात महामार्ग प्राधिकरणाला सात दिवसाच्या आत संविधान चौक व सरकारी दवाखाना चौकात अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग काढण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मार्ग न निघाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या मागणीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून दखल घेत उपजिल्हा रुग्णालय चौक व संविधान (कलोडे) चौक या दोन्ही चौकात वेग प्रतिबंधक ब्रेकर , ब्लींकिंग लाईट, व फलक लावण्यात आले तसेच या दोन्ही चौकात उड्डाण पूल देखील मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अरविंद काळे यांनी हिंगणघाटला येऊन संविधान चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदीले यांना याबाबत सर्व माहिती देत निर्माण होणाऱ्या उडान पुलाचा नकाशा देखील दाखविला. या दोन्ही उडान पुलाचे काम पुढील तीन महिन्यात सुरू होणार असून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे अशी देखील माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर यांच्याकडून देण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर संविधान चौक व सरकारी दवाखाना चौकात सततचे अपघात आहे मागील वर्षभरामध्ये 16 व्यक्तींना आपला जीव अपघातात गमवावा लागला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले हे या सततच्या अपघातामुळे आक्रमक झाले होते, वांदीले यांच्या नेतृत्वात केल्या गेलेल्या मागणीला यश आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या दोन्ही चौकात केले गेलेल्या उपाययोजनामुळे व दोन्ही चौकात होणाऱ्या उडान पूलांमुळे अपघातांना आळा बसणार आहे.

अतुल वांदीले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले हे या सततच्या अपघातामुळे आक्रमक झाले होते, वांदीले यांच्या नेतृत्वात केल्या गेलेल्या मागणीला यश आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या दोन्ही चौकात केले गेलेल्या उपाययोजनामुळे व दोन्ही चौकात होणाऱ्या उडान पूलांमुळे अपघातांना आळा बसणार आहे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन ब्रेकर, ब्लिंकिंग लाईट व फलक संविधान चौक व सरकारी दवाखाना चौक येथे लावली असून महामार्गावरील सुसाट वाहनांच्या वेगाला तात्पुरता ब्रेक बसला आहे. या उपाय योजनेने अपघातांची संख्या कमी होणारं मात्र या अपघातांना आळा घालण्यासाठी म्हणून या दोन्ही चौकात उड्डाण पूल होणे गरजेचे होते. यामुळें या चौकात उड्डाण पूल मंजुर करण्याची आमची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अरविंद काळे यांनी माझी भेट घेत याबाबात सविस्तर माहीती दिली. आंदोलन करू नका आम्ही उडान पूल मंजूर केला आहे असे आश्वासन आम्हाला देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आमच्या मागणीची दखल घेतल्याने आता आम्ही कलोडे चौकात महामार्ग खोदण्याचे आंदोलनं थांबविले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अरविंद काळे यांचा पुढाकार, महामार्ग प्राधिकरणाला लाभला जनभावना समजणारा अधिकारी.
हिंगणघाट शहरातील संविधान चौकात व उपजिल्हा रुग्णालयात चौकात होणाऱ्या सततच्या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निवेदन मिळताच या अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अरविंद काळे यांनी पुढाकार घेत जनभावना समजून घेऊन ताबडतोब विविध उपाय योजना अपघात रोखण्याच्या दृष्ट्रीकोनातून केल्या. स्वतः सरकारी दवाखाना चौक व संविधान (कलोडे) चौक येथे येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीचे अतुल वांदीले यांना भेट घेत चौकात नेऊन चौकात केल्या गेलेल्या उपाय योजनेची माहिती दिली. याबाबत उड्डान पूल दोन्ही चौकात मंजूर करण्यात आला असून उड्डान पूल कसा असणार त्याचा नकाशा देखील दाखविला. यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हे सुस्तावलेले असतात असा होणारा सततचा आरोप या प्रोजेक्ट डायरेक्टर च्या माध्यमातून खोडून काढण्यात आला आहे.

Previous Post

चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडल, महाराष्ट्र राज्य के हस्ते शहर के गांधी वार्ड में चौक सौन्दर्यकरण का लोकार्पण.

Next Post

что Нужно Знать об Ставках На Спорт Новичку%2C Как значит Делать Ставки начавшим%2C Советы Чемпиона

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

что Нужно Знать об Ставках На Спорт Новичку%2C Как значит Делать Ставки начавшим%2C Советы Чемпиона

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In