Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी, 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेवरील अक्षर सारखेच, संस्था चालकांचा सहभाग असण्याची शक्यता.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 20, 2023
in क्राईम, तंत्रज्ञान, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी, 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेवरील अक्षर सारखेच, संस्था चालकांचा सहभाग असण्याची शक्यता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बारावीच्या परीक्षेत मास कॉपी अर्थात सामूहिक रित्या पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील अक्षर सारखेच असल्याने बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.हे सगळे विद्यार्थी अंबाजोगाई आणि हिंगोली येथील आहेत.परीक्षा देताना एकाच व्यक्तीने पेपर सोडवले का?एकाच ठिकाणी बसून हा सगळा प्रकार मॅनेज केला गेला का ?यामध्ये संस्थाचालक सहभागी आहेत का ? या प्रश्नांची उत्तरं अजून येणं बाकी आहे.

इयत्ता 10,12 बोर्ड परीक्षा HSC, SSC BOARD EXAM काळात अनेक गैरप्रकार समोर आले. आता या दोन्ही बोर्ड परीक्षांचे निकाल जवळ आले आहे. परंतु याचा घोळ काही मिटत नसून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एक गंभीर प्रकार समोर आला. भौतिकशास्त्र (physics) पेपर मध्ये अक्षर बदल आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच पेपर तपासणी करणाऱ्यांनी याची माहिती बोर्डाला दिली. बोर्डाने गंभीर दखल घेऊन या सर्व 300 पेक्षा जास्त 12 च्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद (छ.संभाजी नगर) विभागीय कार्यालयाने सुनावणीसाठी बोलावलं आहे. याची चौकशी सुरू झाली असून पहिल्या दिवशी एकूण ८७ विद्यार्थी सुनावणीसाठी हजर झाले. हे सर्व विद्यार्थी अंबाजोगाई येथील असून इतर मागे राहिलेले विद्यार्थी बहुतांश अंबाजोगाईचेच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या विद्यार्थ्यांच्या निकालाला उशीर लागणार असे चिन्ह दिसून येत आहे.

बारावीच्या भौतिकशास्त्र ( physics ) पेपरचे काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु यामध्ये अक्षर व शाई बदल आढळून आला. तसेच उत्तराच्या व्यतिरिक्त ही काही मजकूर लिहिला आहे. हा प्रकार पेपर तपासणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बोर्डाला याची कल्पना दिली. याची दखल घेऊन बोर्डाने या सर्व 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली. यासाठी सर्वांना बोर्डात सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितले असून, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू झाली आहे.

सुनावणीसाठी हजर असलेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही परीक्षा काळात काहीच चुकीचे काम केले नाही. पेपर वर जे अक्षर आहे ते आमचे नाही असे स्पष्ट सांगितले आहे. या प्रकाराबद्दल विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला. सुनावणीसाठी हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे बोर्ड अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात घेतलं आहे विद्यार्थी म्हणतात आमचं अक्षरचं नाही. मग हे लिहिले कोणी? या मागचा उद्देश काय? या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे वृत आहे.

बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत हा सर्व प्रकार समोर कसा घडला आहे? भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर कसे काय आले? त्यामुळे संबंधित सेंटरच मॅनेज झाले होते की, उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या? परीक्षा झाल्यावर ही उत्तरे लिहिण्यात आली का? प्रथमदर्शनी उत्तरपत्रिकांमध्ये अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिलेली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण?

हा सर्व प्रकार समोर आल्यावर 15 मे पासून परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेण्यात आली. हा प्रकार कुठे झाला. उत्तरपत्रिका जमा कधी केल्या, त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या, अशी केंद्र संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यानंतर पर्यवेक्षक, कस्टडियनचीदेखील सुनावणी घेण्यात आली. आता मॉडरेटरची सुनावणी घेतल्यानंतर हा प्रकार कसा व कुठे घडला, या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. आताच उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी बाहेर दिल्या होत्या की, सेंटरमध्येच ते मॅनेज केले होते, हे समोर येण्याची शक्यता आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नागपूरकरांनो सावधान! शहरात सांडपाण्यात मिळून आले चिकुन गुनिया, रेबीज व कोरोनाचे विषाणू.

Next Post

रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून आळीपाळीने सामूहिक अत्याचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून आळीपाळीने सामूहिक अत्याचार.

रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून आळीपाळीने सामूहिक अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In