वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- संपूर्ण पुणे जिल्हात हेल्मेट बाबत जनजागृतीसाठी शहर आणि जिल्ह्यात 24 मे रोजी ‘हेल्मेट दिवसाचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील आणि शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
अपघाताचे प्रमाण दिवसनदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अपघात अनेकाचे जीव पण गेले आहे. काहींना कायमच अपंगत्व आले आहे. अशा वेळी हेल्मेट वापल्याने अनेकाचे प्राण वाचले आहे. त्यामुळे प्रवास करताना हेल्मेट खूप गरजेचं आहे. त्याच्या जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चार वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने मोटार वाहन कायद्यानुसार प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. जागतिक स्तरावर 15 ते 21 मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषया संदर्भात “7 यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2023′ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसार माध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे याबाबत जनजागृतीसाठी हा सप्ताहाचा हेतू आहे.
मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहा अंतर्गत लाक्षणिक “हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले असून तशा सूचना करण्यात आल्या आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

