राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील धाबा डोंगरगाव मार्गावर एक विद्यूत पोल पडण्याच्या स्थितीत असून त्या मार्गाने लोंकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते जर तो विद्यूत पोल कूणाच्या अंगावर पडला तर खूप मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.
या बाबत ची माहिती वारंवार कनिष्ठ अभियंता यांना दिली असून देखील दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या लोंकाच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या विद्यूत पोल कडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर पूर्ण लक्ष केंद्रित करून तो विद्यूत पोल सरळ करून पुन्हा उभा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता यांना केली आहे

